व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) त्यांचा सर्वात लोकप्रिय प्लॅन REDEX बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या REDEX प्लॅनद्वारे युजर्सला नेटफ्लिक्स, डिस्नी प्लस हॉटस्टार यासारख्या प्रमुख OTT अॅपचा अॅक्सेस मिळायचा. परंतु आता हा प्लॅन बंद करण्यात आल्याने युजर्समध्ये नाराजीचे वातावरण आहे.
( हेही वाचा : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; चालकांना कारणे दाखवा नोटीस)
प्लॅन बंद करण्याचा निर्णय
व्होडाफोन आयडियाने त्यांच्या युजर्सचा सर्वात फायदेशीर REDEX पोस्टपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, Disney+Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शनसोबत अनेक फायदे मिळत होते. कंपनीचा हा प्लॅन १०९९, १६९९ आणि २२९९ या किमतीला सुद्धा सबस्क्राईब करता येऊ शकत होता. यामध्ये फ्रि कॉलिंग, डेटा, एसएमएस अशा अनेक ऑफर्स होत्या. मात्र कंपनीने आता हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
इतर प्लॅन
कंपनीने त्यांच्या १५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवस असणार आहे. या प्लॅनमध्ये युजरला ८ जीबी डेटा मिळेल. यामध्ये फ्रि कॉलिंग, एसएमएस या सुविधा मिळणार नाहीत.
Join Our WhatsApp Community