युगांडात अंध मुलांच्या शाळेला आग, ११ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

149

युगांडातील मुकोनो येथील अंध मुलांच्या शाळेला भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत 11 निष्पाप विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – ९ मेट्रो मार्गांकरिता ‘MMRDA’ने घेतले ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य युगांडाच्या मुकोनो जिल्ह्यात मंगळवारी शाळेला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी असे म्हटले की, अंध शाळेत स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु आतापर्यंत 11 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर 6 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

युगांडाच्या शाळांमध्ये शाळांना आग लागणे सामान्य घटना आहे. कारण यापूर्वीही जानेवारीमध्ये अशी घटना घडली होती, जेव्हा युगांडाची राजधानी कंपालामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत 4 मुलांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये मध्य युगांडातील एका हायस्कूलला लागलेल्या आगीत किमान 9 विद्यार्थी ठार झाले होते. 2018 च्या घटनेपूर्वी, 2008 मध्ये आणखी एका शाळेला आग लागली होती, ज्यामध्ये 19 मुलांचा मृत्यू झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.