LIC जीवन लक्ष्य योजना : विमाधारकाचा मृत्यू झाल्यास LIC भरणार प्रीमियम; मिळेल चांगला परतावा, जाणून घ्या प्लॅन

168

भविष्याचा विचार करून अनेक लोक विविध योजना, म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करतात. जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ने विशेष योजना सुरू केली आहे, याद्वारे तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा मिळू शकतो. जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतही मॅच्युरिटी पूर्ण होते. पॉलिसीधारचा मृत्यू झाल्यास कंपनी प्रीमियमचा खर्च उचलते तर १० टक्के हिस्सा हा Sum Assured स्वरूपात दरवर्षी नॉमिनीला दिला जातो.

( हेही वाचा : विदर्भ-कोकण विशेष ट्रेन आता ३१ डिसेंबरपर्यंत धावणार; प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेचा निर्णय)

‘ही’ पॉलिसी कोण घेऊ शकते?

LIC जीवन लक्ष्य योजनेद्वारे चांगला परतावा मिळू शकतो. तसेच LIC मध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. एलआयसी जीवन लक्ष्य योजना ही १३ ते २५ वर्षांच्या मुदतीसाठी आहे. या पॉलिसीमध्ये १८ ते ५५ वर्ष या वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेत तुम्ही दरमहा, तीन महिने, सहा महिने अथवा वार्षिक पद्धतीने प्रीमियम भरू शकता.

पॉलिसी मॅच्युरिटीनंतर सर्व पैसे नॉमिनीला दिले जातात

या पॉलिसीमध्ये, पॉलिसी मॅच्युअर होण्याआधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास LIC कडून प्रीमियमचा खर्च उचलला जातो. पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत दरवर्षी Sum Assured चे १० टक्के नॉमिनीला दिले जातात. पॉलिसी मॅच्युरिटीनंतर सर्व पैसे नॉमिनीला दिले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.