ठाण्यात फटाक्यांमुळे १० ठिकाणी लागल्या आगी

142

दिवाळीत सर्वत्र फटाके वाजवले जात असतात, मात्र यामुळे आगीचे प्रमाणही वाढत असते. अशाच प्रकारे ठाण्यात फटाके वाजवले जात असल्याने त्यातून आगीच्या घटना घडल्या आहेत. फटाक्यांमुळे ठाण्यात तब्बल १० ठिकाणी आगी लागल्या. यात या आगी विझवण्यासाठी मात्र अग्निशमन दलाची दमछाक पाहायला मिळाली.

मॉलजवळ आग 

ठाणे येथे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या आगीच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या दिवशी फटाके फोडून दिवाळी जल्लोषात साजरी केली गेली. लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी असल्याने या दिवसांत किरकोळ आगीच्या घटना समोर आल्या आहेत. विवियाना मॉलजवळ स्कायवॉकच्या बाजूला कचऱ्याला आग लागली होती. महात्मा फुलेनगर येथील आई माता मंदिरजवळ, सचिन तेंडुलकर स्टेडियमच्या बाजूला झाडाला आग लागल्याची घटना घडली. खोपट येथील जानकी आनंद सोसायटीजवळ शिवसेना शाखेच्या बाजूला झाडाला आग लागली होती. कळवा, खारेगाव येथील इमारत क्रमांक- १४, आनंद विहार कॉम्प्लेक्स, खारेगाव नाका येथे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरती असलेल्या खिडक्यांच्या जाळीला आग लागली होती. मुल्लाबाग, निळकंठ ग्रीन, येथे फेमिगो इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील खोली क्रमांक-२००२ मध्ये वॉशिंग मशीनच्या युनिटला आग लागली होती. कळवा येथील सायबा हॉल, तरण तलाव जवळ, गेट क्रमांक-०१ च्या बाजूला पत्र्याच्या शेडवरती असलेल्या प्लास्टिकला आग लागली होती. कळवा, खारेगाव येथील ९० फीट रोड, पारसिक नगर येथे झाडाला आग लागली होती. पोखरण रोड क्रमांक-०१ येथील कोर्ट-यार्ड सोसायटीजवळ, रोझाना टॉवरच्या बाजूला, इमारतीच्या २८व्या मजल्यावरील गॅलरीत असेलल्या कचऱ्याला आग लागली होती. कोपरीत साई नगरी सोसायटी, चेंदनी कोळीवाडा, येथे झाडाला आग लागली. ठाणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक-०१ समोर, दादा पाटीलवाडी, बी-कॅबिन, येथे वर्स- स्टाईल फिटनेस जीममध्ये आग लागली होती. तसेच ठाणे स्टेशन रोड, प्रभात सिनेमाजवळ जय हिंद कलेक्शन या दुकानाच्या छतावरती असलेल्या प्लास्टिक ताडपत्रीला आग लागली होती. या सर्व घटना किरकोळ स्वरूपाच्या असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

(हेही वाचा फटाके वाजवल्याने मुसलमान वैतागले, मनसेने सुनावले!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.