मध्य रेल्वेने याआधीच मुंबई आणि नागपूर स्थानकांवर विनाभाडे महसूल योजनेअंतर्गत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले आहे. या प्रकल्पाचे यश पाहून मध्य रेल्वे लवकरच आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करणार आहे. माथेरानमध्येही मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्यामुळे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’सुरू झाल्यास चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.
( हेही वाचा : विदर्भ-कोकण विशेष ट्रेन आता ३१ डिसेंबरपर्यंत धावणार; प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेचा निर्णय )
माथेरानसह या ७ ठिकाणी सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’
आता आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान अशा 7 ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
कसे आहे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’?
‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करणारी मध्य रेल्वे ही एकमेव रेल्वे आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उघडलेले मध्य रेल्वेचे पहिले ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या समोरील, हेरिटेज गल्ली येथे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये रूळांवर बसवलेले सुधारित कोच आहेत. हेरिटेज गल्लीमध्ये नॅरो गेज लोकोमोटिव्ह, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे काही भाग इत्यादींसह रेल्वेने कलाकृती बनवली आहे. ‘बोगी-वोगी’ असे नाव दिलेले हे एक उत्तम जेवणाचे ठिकाण प्रवाशांसाठी आकर्षण ठरले आहे. या कोचमध्ये १० टेबलांसह ४० ग्राहकांची व्यवस्था आहे. या रेस्टॉरंट ऑन व्हील्समध्ये आजवर सुमारे ६० हजार प्रवाशांनी जेवणाचा आनंद लुटला आहे.
Join Our WhatsApp Community