गिरगाव येथील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत पाच ते सहा मोटार कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर कंपाऊंडमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे कपडे, प्लास्टिक आणि नायलाॅनचे रोल जळून खाक झाले आहेत. तसेच बाजूच्या दोन घरांनाही आग लागली आहे. फटाक्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हाऊस कंपाऊंडमध्ये ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच तिथे राहणा-या लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. फटाक्यांमुळेच ही आग लागल्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे या आगीमुळे नकुसान झाले आहे.
( हेही वाचा: मुंबई पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला? पोलिस दलात चर्चेला उधाण )
Join Our WhatsApp Community