दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतताना सकाळीच चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. S-3 सीएसएमटी- कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचा-यांनी तत्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी 7.50 वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाल्याचे, त्यांनी सांगितले.
Technical problem in S3 local attended by staff and train re-started at 7.50am.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) October 27, 2022
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तत्काळ तांत्रिक बिघाड दूर केला असून, लोकल सेवा पूर्ववत झाल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी दिली आहे. अशातच लोकल सेवा पूर्ववत झाली असली, तरी लोकल काही काळ विलंबानेच धावत आहेत. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Join Our WhatsApp Community