एसटी महामंडळाच्या (ST Corporation) ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. एसटी राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाची 302 वी बैठक 28 ऑक्टोबरला पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दर तीन महिन्याला ही बैठक नियमितपणे पार पडत असते. मात्र, सत्तांतरामुळे चार महिन्यांनंतर ही बैठक पार पडणार आहे.
( हेही वाचा: आदित्य ठाकरेंवर शेंबड मुलदेखील विश्वास ठेवणार नाही; रामदास कदम )
एसटी कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढणार?
27 ऑक्टोबरला एसटी राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाची 302 वी बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यात बैठकीत एसटी महामंडळाच्या ताफ्यात चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. ज्यात सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील, तर दोन हजार इलेक्ट्रीक गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली होती. तसेच, ज्या आहेत त्या देखील वाईट परिस्थितीत आहेत. कर्मचा-यांची संख्या अधिक आणि गाड्या कमी अशी अवस्था महामडंळाची झाली होती, त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. एसटी कर्मचा-यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरीची शक्यता आहे. ज्यामुळे कर्मचा-यांच्या हाती अधिकचे पैसे मिळू शकतील.
Join Our WhatsApp Community