‘या’ प्रसिद्ध सिनेनिर्मात्याने केला बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न; पहा व्हिडीओ

165

फिल्ममेकर म्हणून प्रसिद्ध असलेले कमल किशोर मिश्रा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या बायकोच्या अंगावर कार घातली आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अंधेरी येथे ही धक्कादायक घटना 19 ऑक्टोबर रोजी घडली होती. कमल किशोर मिश्रा यांच्यावर आता अंधेरी पोलिसांनी गुन्हादेखील नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

( हेही वाचा: गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग; लाखोंच्या गाड्या जळून खाक )

घटनेत पत्नी गंभीररीत्या जखमी

कमल किशोर मिश्रा यांनी अंगावर कार घातल्यामुळे त्यांची पत्नी जखमी झाली. अंधेरी पश्चिमेच्या राहत्या इमारतीमधील पार्किंगमध्ये ही थरारक घटना घडली. कमल किशोर यांच्या पत्नीने आपल्या पतीला दुस-या महिलेसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर त्यांनी कारमधून पळ काढण्याच्या इराद्यात असलेल्या पतीला मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे कमल किशोर यांनी पत्नीचा विरोध न जुमानता तिच्या अंगावरुनच कार नेली. यात पत्नी गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. या थरारक घटनेत कमल किशोर त्यांच्या पत्नीच्या पायाला, डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.