फ्लोरिडामध्ये बाईक चालवणाऱ्यांना हेल्मेट घालणे सक्तीचे आणि आवश्यक करणाऱ्या कायद्यांविरूद्ध आयुष्यभर लढा देणाऱ्या वकिलाचा हेल्मेट न घातल्यानेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
(हेही वाचा – आणखी 15 वर्षे सत्तेसाठी राष्ट्रवादीला तळमळत बसावं लागेल, शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा)
मिळालेल्या माहितीनुसार, वय वर्ष ६६ असणाऱ्या रॉन स्मिथ नावाच्या वकिलाने हेल्मेटसक्ती विरोधात लढा दिला होता. रॉन स्मिथ हा एका दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या अंत्यविधीला निघाला होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातावेळी त्याची ६२ वर्षीय गर्लफेंड ब्रेंडा जीनन वोल्प ही सुद्धा सोबत होती. तिचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते.
असेही सांगितले जात आहे की, ब्रदरहुड अगेन्स्ट टोटॅलिटेरियन एनॅक्टमेंट्सचा रॉन हा सदस्य होता. अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यात ज्यांनी मोटरसायकल नियम मोडले अशा नागरिकांची न्यायालयात बाजू मांडली होती. त्याने २००० साली राज्यात तयार करण्यात आलेली हेल्मेटची सक्ती नसावी आणि ही सक्ती उलथून टाकावी यासाठी मदत केली असे काहींचे म्हणणे आहे. रॉनच्या मते, प्रत्येकाला स्वतःची आवडनिवड असते, असे त्याचा मित्र डेव्ह न्यूमन यांनी सांगितले होते. त्यामुळे हेल्मेट घालावे की नाही हे प्रत्येक जण ठरवेल, असे त्याचे काहीसे मत होते.
Join Our WhatsApp Community