उत्तर प्रदेशातील अमेठी शहरातील इंडिया वन एटीएममधून सोमवारी संध्याकाळी 200 रुपयांची खेळण्यातील बनावट नोट बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या नोटवर Full Of Fun असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ATM ने निकला 'चूरन वाला नोट', दो-दो सौ रुपए के नकली नोट निकले
यूपी के अमेठी जिला में कई ग्राहकों को नकली नोट मिलने से हड़कंप pic.twitter.com/iMwZsZ5JdG
— आदित्य तिवारी / Aditya Tiwari (@aditytiwarilive) October 25, 2022
काय आहे नेमके प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण अमेठी शहरातील इंडिया वन एटीएमचे आहे. जिथे सोमवारी संध्याकाळी एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांची रांग लागली होती. यावेळी एका व्यक्तीला एटीएममधून मूळ नोटेसह 200 रुपयांची बनावट नोट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पाहून घटनास्थळी आश्चर्य व्यक्त केले गेले. काही वेळातच तिथे गर्दी जमली. लोकांना याची माहिती अमेठी पोलिसांना दिली. या घटनेचा व्हिडिओ एका सोशल मीडिया वापरकर्त्याने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
( हेही वाचा: ST महामंडळाच्या ताफ्यात लवकरच चार हजार नव्या गाड्या होणार दाखल )
Join Our WhatsApp Community