तुम्ही हिंदू असाल तर हलाल का खाणार? जाणून घ्या हलाल पदार्थांची यादी…

1780

भारतात मुसलमानांची समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, त्यासाठी हिंदू उत्पादकांना हलाल प्रमाणपत्र घेणे सक्तीचे केले जात आहे. त्याविरोधात सध्या हिंदू एकवटले आहेत. हलालच्या माध्यमातून देशात मुस्लिम संघटना हिंदूंकडून पैसा जमा करून तो दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये जनक्षोभ आहे. कोणकोणत्या उत्पादकांना हे हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागले आहे, याची सूचित प्रसिद्ध झाली आहे. आता हलाल च्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद यांच्यासह तीसहून अधिक संघटनांनी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन सुरु केले आहे. यासाठी हलाल सक्ती विरोधी परिषद आयोजित करण्यात आली. त्यानंतर हलाल सक्ती विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या ,माध्यमातून देशभरात आंदोलने सुरु आहेत.

Halal Prod 1

 

Halal Prod 2

halal 4 1

हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर अतिक्रमण 

हलाल हा इस्लामी प्रचाराचा आणि हिंदूंना भ्रष्ट करण्याचा मार्ग मानला जातो. या अंतर्गत, कोणत्याही उत्पादनाच्या निर्मितीसाठी, मुसलमान प्रथम कलमा वाचतो आणि अल्लाहला अर्पण करतो. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, हलाल म्हणून प्रमाणित केलेल्या सर्व गोष्टी हिंदू धर्माच्या किंवा गैर-इस्लामी लोकांच्या श्रद्धांवर अतिक्रमण आहेत. परंतु, इस्लामिक देशांच्या जागतिक दबावाखाली भारतीय कंपन्या हलाल प्रमाणपत्र मिळवून तेच उत्पादन हिंदूंना पुरवत आहेत. आतापर्यंत बहुसंख्य हिंदू समाजाला या कंपन्यांच्या कारस्थानाची कल्पना नव्हती, ज्याचा अशा कंपन्या मोठा फायदा घेत होत्या. पण आता सजग हिंदू समाजाच्या विरोधामुळे लोकांना हळुहळू हलालची जाणीव होत आहे. हलाल प्रमाणित उत्पादन हे हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे स्पष्ट उल्लंघन आहे. हलाल उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या देशातील ऐंशी टक्के हिंदूंच्या आर्थिक फायद्यासाठी अप्रमाणित, खाजगी अजेंडा घेऊन इस्लामचा प्रचार करण्यासाठी कट रचत आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांची उत्पादने जाणून घेणे आवश्यक आहे.

(हेही वाचा हलाल विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम, डोंबिवलीत कोकण महोत्सवातून हलाल स्टॉल फलक हटवला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.