औरंगाबादमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला भीषण आग

135

औरंगाबाद मध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. पण या दुर्घटनेमुळे काही काळ एसटीमधील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती.

प्रवाशी सुखरूप

एसटी महामंडळाच्या बसला औरंगाबाद येथील सावंगी फाट्याजवळ गुरुवारी आग लागली. या बसमध्ये यावेळी प्रवाशी होते. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण प्रवाशांनी बसमधून धूर एऊ लागल्यानंतर तातडीने बसमधून पळ काढला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘मनसे सरडाही लाजेल इतके रंग बदलणारा पक्ष’, पेडणेकरांची टीका)

शिवशाही बसचाही अपघात

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला देखील बुधवारी पुणे-नाशिक रोडवर भीषण आग लागली होती. शिवशाही बसने महावितरणच्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. त्यामुळे अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या या जमिनीच्या दिशेने झुकल्या होत्या. या बसने रिक्षालाही धडक दिल्याने रिक्षाचालकासह चार प्रवासी जखमी झाले होते. मुख्य म्हणजे या बसचे अॅक्सिलेटर चक्क एका दोरीने बांधलेले होते आणि ब्रेकजवळ दगड ठेवले असल्याचे आढळून आले. विजेच्या खांबावर धडकल्यानंतर जर का विजेच्या तारा या बसवर कोसळल्या असत्या तर या बसला आग लागण्याची शक्यता होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.