राज्यासह संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी भाऊबीजही सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पण याच भाऊबीजेच्या दिवशी मध्य प्रदेशातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भावाने लावलेल्या फटाक्यामुळे बहिणीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना मध्य प्रदेशातील मंदसौर भागातील कारजू गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील सर्वांची मने सुन्न झाली आहेत.
काय झाले नेमके?
कारजू गावात राहत असलेल्या माली कुटुंबात बुधवारी गोवर्धन पूजा होती. ही पूजा संपन्न झाल्यानंतर या कुटुंबातील टीना हा आपल्या लहान भावासोबत फटाके लावण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या लहान भावाने एका स्टीलच्या टिफिनमध्ये सुतळी बॉम्ब लावला. त्यावेळी टीना त्याचा व्हिडिओ शूट करत होती. पण सुचळी बॉम्ब फुटल्यानंतर या स्टिलच्या डब्याचा टोकदार तुकडा टीनाच्या पोटात घुसला.
(हेही वाचाः वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार)
परिसरात हळहळ
या अपघातानंतर टीनाला तिच्या कुटुंबीयांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर घडलेला प्रकार सर्वांच्या समोर आला. टीनाच्या या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community