संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सुरक्षा सल्लागार राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात पोहोचले

165

संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे यांनी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस (नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी) ला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी कुलगुरू डॉ. जे.एम. व्यास यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षेवर जोरदार चर्चा झाली. NFSU हे जगातील एकमेव न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आहे जे फॉरेन्सिक विज्ञान तज्ज्ञ निर्माण करते. जगात जसजशा अनेकविध स्वरुपाच्या घटना घडू लागल्या, तसे फॉरेन्सिक सायन्स (फॉरेन्सिक सायन्स किंवा NFSU) तज्ज्ञांची आवश्यकता वाढत गेली. याचा उपयोग केवळ गुन्ह्यांसाठीच नाही, तर संरक्षण क्षेत्र आणि सामान्य जीवनासाठीही उपयोगी ठरत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढत गेली आहे, ही मागणी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (NFSU) ची स्थापना करण्यात आली.

संरक्षण क्षेत्रात NFSU

‘सेंटर फॉर फ्युचरिस्टिक डिफेन्स स्टडीज’ (CFDS)  अर्थात NFSU ही संरक्षण क्षेत्रासाठी अभ्यासक्रम चालवते. आहे. त्याचा उद्देश संशोधनासाठी प्रशिक्षण आणि विकासासाठी संशोधन हा आहे. या अंतर्गत संरक्षण क्षेत्र आणि निमलष्करी दल यांसाठी संशोधन केले जाते. हा केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचा एक भाग आहे. या अभ्यासक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रासाठी संशोधन आणि विकास कार्याला लक्ष्य करून प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता ओळखून त्यावर काम करता येईल. NFSU चा CFDS अभ्यासक्रम सायबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW), इन्फॉर्मेशन वॉरफेअर (IW), नेटवर्क सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी ऑफ एम्बेडेड सिस्टम सॉफ्टवेअर इन वेपन अँड वेपन प्लॅटफॉर्म, सायबर डिफेन्स सेंटर इत्यादींचे प्रशिक्षण देतो. जेणेकरून संरक्षण क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज मनुष्यबळ मिळू शकेल.

(हेही वाचा तुम्ही हिंदू असाल तर हलाल का खाणार? जाणून घ्या हलाल पदार्थांची यादी…)

सामरिक आणि रणनीतीक क्षेत्रात विकास

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद जी. खंदारे हे संरक्षण क्षेत्रातील सामरिक आणि रणनीतीक आघाडीवरचे अनुभवी नाव आहे. ज्यांची सेवा सप्टेंबर १९७९ मध्ये सुरू झाली आणि चार दशके सुरू होती. यानंतरही महासंचालकपदावर राहून त्यांनी डिफेंस इंटेलिजेन्स एजेंसी आणि डेप्युटी चीफ इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ फॉर इंटेलीजेंस अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली. जानेवारी 2018 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान ते पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार होते, सध्या ते संरक्षण मंत्रालयात मुख्य सुरक्षा सल्लागार आहेत. अशा स्थितीत असताना त्यांची NFSU ची भेट ही संरक्षण क्षेत्रासाठी एका मोठ्या प्रकल्पाची नांदीही ठरू शकते. त्यांच्या अनुभवांचाही NFSU ला खूप फायदा होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.