महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असे एक गाव आहे, जिथे 80 लोक करोडपती आहेत. एवढेच नाही तर या गावात एकही डास नाही. याठिकाणी कोणी डास शोधून दाखवल्यास त्याला 400 रुपयांचे बक्षीस दिले जाते, असे सांगितले जात आहे. या गावाचे नाव हिवरे बाजार असे आहे. हिवरे बाजार हे गाव एकेकाळी दुष्काळाने होरपळत होते. पण इथल्या लोकांनी स्वतःहून या गावाची रूपडं बदलले आहे. हे गाव नेहमी चर्चेत असते.
(हेही वाचा – नोटांवर ‘या’ महापुरुषांसह मोदींचाही फोटो लावा; भाजपच्या राम कदमांची मागणी, ट्वीट व्हायरल)
एवढेच नाही तर इथे एकही डास सापडत नाही. जर इथे एकही डास सापडला तर 400 रूपये बक्षिस दिले जाते. हिवरे बाजार गावात 305 कुटुंबे राहतात, त्यापैकी 80 लोक करोडपती आहेत. 1990 च्या दशकात हिवरे बाजारातील 90 टक्के घरे गरीब होती, मात्र आता या गावाचे नशीब पालटले आहे. हिवरे बाजारची कहाणी रंजक मानली जाते.
या पिकांना होती बंदी
पाणी वाचवण्यासाठी हिवरे बाजारच्या लोकांनी गावातील त्या पिकांना बंदी घातली ज्यांना पिकण्यासाठी जास्त पाणी लागते. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे येथील पाण्याची पातळी 30-35 फुटांपर्यंत खाली आली आहे. गावातील बोअर, विहिरी संपल्या आहेत.
पाणी वाचवण्यासाठी केल्या या उपाययोजना
विशेष म्हणजे हिवरे बाजार गावात पूर्वी ऊस, ज्वारी आदी पिकं घेतले जात होते, मात्र या पिकांच्या बंदीनंतर येथे बटाटा, कांद्याची लागवड केली गेली. यातून लोक भरपूर पैसे कमवत आहेत. या गावात 305 कुटुंबे आहेत आणि सुमारे 1250 लोक आहेत. यापैकी 80 लोक करोडपती आहेत. 50 पेक्षा जास्त कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे.
Join Our WhatsApp Community