भारतीय वायू दलासाठी TATA बनवणार C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट

117

भारतीय वायू दलासाठी टाटा एअरबस कंपनी सी-295 हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवणार आहे. गुजरातच्या वडोदरा येथील फॅक्टरीत हे विमान बनवणार असल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे विमान संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान असणार आहे. भारतात तयार झालेल्या विमानांची पूर्तता सन 2026 पासून 2031 पर्यंत केली जाणार आहे. यांपैकी 16 विमाने 2023 ते 2025 दरम्यान येणार आहेत. यामुळे भारतीय हवाई दलांकडे सी- 295 ट्रान्सपोर्ट विमानांची सर्वात मोठी फ्लीट असणार आहे.

(हेही वाचा – आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ईडी, सीबीआय चौकशी व्हावी; काँग्रेसची मागणी)

याबाबच संरक्षण सचिवांनी सांगितले की, याबाबत भारताचे धोरण असे आहे की, भारतात जे काही बनवले जाऊ शकेल ते इथेच बनवले जाईल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हे जोरदार प्रयत्न आहेत. गुजरातच्या वडोदरा येथील प्लांटचे उद्घाटन 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या 16 विमानांची निर्मिती स्पेनमध्ये केली जाईल आणि युरोपियन कंपनी एअरबस चार वर्षांत ‘फ्लाइंग मोड’मध्ये भारतात वितरित करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पॅनिश कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत 56 सी-295 वाहतूक लष्करी वाहतूक विमाने खरेदी करण्याचा करार गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी झाला होता. करारावर स्वाक्षरी केल्यापासून 48 महिन्यांच्या आत स्पॅनिश कंपनी भारताला ‘फ्लाइंग मोड’मध्ये 16 विमानांचा पुरवठा करेल, असा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. उर्वरित 40 विमाने भारतातील टाटा कन्सोर्टियमद्वारे तयार केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.