एका बाजूला भारतात घरासमोस दिवे लावणे, शुभ कार्याच्या वेळी दरवाजासमोर रांगोळी काढणे, दिवे लावणे हे जुनी-पुराणी, टाकाऊ संस्कृती आहे, अशी टीका करणारे महाभाग भारतात निपजले जातात, पण त्याचवेळी भारतीय वंशाचे ब्रिटनमधील पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मात्र सातासमुद्रापलीकडे असतानाही भारतीय, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. ऋषी सुनक यांनी घरासमोर स्वतःच्या हाताने दिवे लावून वातावरण प्रकाशमान केले.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे ५७वे पंतप्रधान बनले आहेत. सध्या सोशल मीडियावर ऋषी सुनक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते कार्यालयाच्या दारात दिवे लावताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यावर त्यांनी कार्यालयासमोर दिवे लावले. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना वाघ आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, पहिल्यांदा कार्यालयात पाऊल ठेवण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या दारात दीप प्रज्वलन करताना…गर्व से कहो हम हिंदू है…’ मात्र आता या व्हिडीओमागचे सत्य समोर आले आहे.
ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, पहिल्यांदा कार्यालयात पाऊल ठेवण्या पूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या दारात दीप प्रज्वलन करताना…
गर्व से कहो हम हिंदू है… pic.twitter.com/4rDGjszK6j— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 27, 2022
(हेही वाचा तुम्ही हिंदू असाल तर हलाल का खाणार? जाणून घ्या हलाल पदार्थांची यादी…)
व्हिडिओमागील सत्य
माध्यमांच्या काही रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक यांचा हा फोटो २०२० सालचा आहे. त्यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त लंडनमधल्या डाऊनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या घराच्या दारात रांगोळी आणि दिवे लावले होते. त्यावेळी ऋषी ब्रिटनचे चान्सलर होते आणि त्यांचा हा फोटो तेव्हाही चर्चेत आला होता. अनेक परदेशी, तसेच भारतीय वेबसाईट्सने १३ नोव्हेंबर २०२० ला हा फोटो प्रकाशित केला होता. त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी यांनी दिवाळीनिमित्त दिवे लावले हा दावा चुकीचा आहे. हा फोटो आत्ताचा नसून दोन वर्षे आधीचा आहे.
Join Our WhatsApp Community