महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी महापालिकेच्या मंड्यांमध्ये जागा

140

केंद्र सरकारने सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर एक स्टेशन, एक उत्पादन अशी संकल्पना राबवून महिला बचत गटांना जागा उपलब्ध दिल्यानंतर आता महापालिकेच्या मंड्यांमध्येही बचत गटांना गाळे देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेच्या मंड्यांमध्ये आता काही गाळे हे महिला बचत गटांसाठी राखीव ठेवले जाणार असून हे गाळे प्रत्येक संस्थांना लॉटरी पध्दतीने ११ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्याचा विचार बाजार विभागाच्या माध्यमातून सुरु आहे.

( हेही वाचा : T20 World Cup 2022 : आता ‘३० ऑक्टोबर’च्या सामन्याची प्रतीक्षा)

मुंबईत महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यामाध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिला बचत गटांना यापूर्वी आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन देणाऱ्या महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्ममातून बचत गटांचे मेळावे आयोजित करून त्यांच्या उत्पादनांना बाजार पेठ उपलब्ध करून दिली जाते. त्याबरोबरच आता महिला बचत गटांना महापालिकेच्या मंड्यांमध्ये गाळे उपलब्ध करून देण्याचा विचार सुरु आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिषकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या सहा ते सात मंड्यांच्या जागा निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच महापालिकेच्या मंड्यांमध्ये महिला बचत गटांना जागा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्यावतीने यापूर्वी व्ही.पी. रोडवरील खोताची वाडी येथील मंडईत तळ मजल्यावर २७ गाळे राखून ठेवून महिला बचत गटांना ते उपलब्ध करून दिले होते. यापूर्वी एक महिन्यांकरता दिले जाणारे गाळे आता ११ महिन्यांकरता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या एकमेव मंडईमध्ये भाडे आकारुन ११ महिन्यांकरता महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी गाळे उपलब्ध करून दिले होते. लॉटरी पध्दतीने महिला बचत गटांना गाळ्यांचे वाटप करण्यात येत असून आता महापालिकेच्या मंड्यांमध्येही महिला बचत गटांना काही गाळे राखून ठेवून त्यांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईत महापालिका नियोजन विभागाकडे सन २०१९ पर्यंत ११३५ नोंदणीकृत संस्था असून यापैंकी टप्प्याटप्प्याने संस्थांना गाळे वितरीत केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.