T20 World Cup 2022 च्या मालिकेत पाकिस्तान झिम्बाब्वेसोबत हरल्याने पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील स्थान डळमळले आहे. पाकिस्तान एकदा भारतासोबत आणि आता झिम्बाब्वेसोबत हरला आहे. सलग २ सामने हरल्याने पाकिस्तान बी ग्रुपमध्ये तळाला पोहचला आहे. आता पाकिस्तान वर्ल्ड कपच्या स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित झाले आहे.
पाकिस्तान २ सामने हरला
T20 World Cup 2022 मध्ये, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचे संघ पर्थच्या मैदानावर आमनेसामने आले. हा सामना खूपच रोमांचक झाला आणि झिम्बाब्वेने 1 धावाने विजय मिळवला. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 8 गडी गमावून 129 धावाच करू शकला. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर बाबर आझम 9 चेंडूत केवळ 4 धावा करू शकले, तर मोहम्मद रिझवानने 16 चेंडूत 14 धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने 44 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पाही स्पर्श करता आला नाही. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने ३ बळी घेतले. दरम्यान पाकिस्तानने दोन सामने हरल्याने पाकिस्तानचे शून्य पॉईंटस आहेत, यामुळे पाकिस्तान तळाला पोहचला आहे, तर झिम्बाब्वेकडे १ पॉईंट होता आता २ पॉईंटची भर पडल्याने झिम्बाब्वेकडे ३ पॉईंट्स झाले आहेत, याचा अर्थ झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका एक सामान आले आहेत.
(हेही वाचा T20 World Cup 2022 : आता ‘३० ऑक्टोबर’च्या सामन्याची प्रतीक्षा)
Join Our WhatsApp Community