‘हा’ दिवाळीतला फुसका फटाका, रवी राणांचा बच्चू कडूंना खोचक टोला

135

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. आपल्यावर खोटा आरोप करत आपली नाहक बदनामी केल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यावरुन आता आमदार रवी राणा यांनी ट्वीट करत बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला हा फुसका फटाका आहे, अशा शब्दांत रवी राणा यांनी बच्चू कडूंना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः रवी राणांच्या विरोधात बच्चू कडूंची पोलिसांत तक्रार)

रवी राणांचे ट्वीट

दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे, अशा शब्दांत ट्वीट करत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे.

(हेही वाचाः सरकारमधील नाराज आमदार माझ्या संपर्कात, मी धमाका करणार! बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा)

बच्चू कडूंचा इशारा

बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सध्या राज्य सरकारमधले 7 ते 8 नाराज आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपर्यंत रवी राणा यांनी पुरावे सादर केले नाहीत आणि मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी ठोस भूमिका घेतली नाही तर आपण मोठा धमाका करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.