पगारवाढ हा सर्वच नोकरदार वर्गासाठी एक आशेचा किरण असतो. नुसता पगार वाढणार हे दोन शब्द ऐकल्यावरही नोकरदार अनेक स्वप्न पाहू लागतात. आता याचबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. जगाच्या तुलनेत भारतातील कर्मचा-यांचे पगार वाढणार असल्याचे एका सर्व्हेतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातील नोकरदार वर्गासाठी हा एक आशेचा किरण असल्याचे म्हटले जात आहे.
वर्क फोर्स कन्सल्टन्सी इंटरनॅशनलच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला असून यामध्ये जागतिक पातळीवर केवळ 37 टक्के देशांमध्येच वेतनवाढ अपेक्षात असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः MSEB चं ग्राहकांना मोठं आवाहन, लाईट बिलाचे आकडे कमी करण्यासाठी मोलाचा संदेश)
भारतात 4.6 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
2023 मध्ये भारत वेतनवाढीच्या बाबतीत आघाडीवर असण्याची चिन्हे असून या वर्षी 4.6 टक्क्यांनी वेतन वाढण्याचा अंदाज या सर्व्हेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. युरोपातील कर्मचा-यांची मात्र निराशा होणार आहे. युरोपात पगारवाढ होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपातील पगारवाढीचा दर -1.5 असल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात येत आहे.
अमेरिकेतही परिस्थिती वाईट
सर्व्हे करण्यात आलेल्या देशांपैकी केवळ एक तृतीयांश देशांमध्येच वास्तविक वेतनवाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 2022 च्या तुलनेत ही स्थिती चांगली असून पुढील वर्षी 2022च्या तुलनेत 1 टक्क्यांनी पगारवाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. 2023 मध्ये अमेरिकेत 4.5 टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. पण सरासरी 3.5 टक्के महागाईचा दर वजा केल्यानंतर पगारवाढीचा अमेरिकेतील दर हा केवळ 1 टक्का होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community