ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी एक मोठा खुलासा केला आहे. चर्चमधील नन आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे देखील इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची जाहीर कबुली पोप फ्रान्सिस यांनी दिली आहे. रोमन कॅथलिक चर्च येथे भविष्यातील धर्मगुरुंसाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पॉर्न व्हिडिओ पाहणं ही एक वाईट सवय असून ती अनेकांमध्ये दिसून येते. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणेच नन आणि प्रीस्ट म्हणजेच ख्रिस्ती धर्मगुरू यांच्यामध्ये देखील ही वाईट सवय असल्याची कबुली पोप फ्रान्सिस यांनी दिली आहे. सर्वसामान्य माणूस देखील अशाच प्रकारे सैतान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ख्रिस्ती धर्मगुरुकडून लैंगिक शोषण
ख्रिस्ती धर्मगुरुंकडून लैंगिक शोषण होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. व्हॅटिकन सिटीने लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे डागाळलेल्या नोबेल शांती पुरस्कार विजेते बिशप कोर्लोस जमिनीस यांच्यावर अनेक निर्बंध घातले होते. 1990 मध्ये जिमिनीस यांनी पूर्व तिमोर येथील लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2019 मध्ये याबाबत आलेल्या तक्रारींनंतर हे निर्बंध घालण्यात आले होते.
(हेही वाचाः भावाने बॉम्ब फोडला बहिणीने प्राण गमावला, भाऊबीजेच्या दिवशीच घडली दुर्दैवी घटना)
अश्लील गोष्टी डिलीट करा
मोबाईलच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोप फ्रान्सिस यांनी म्हटले की मोबाईल फोन सारख्या साधनांचा वापर हा केवळ संवादासाठी करणे उचित ठरेल. मात्र सध्या पोर्नोग्राफीचे स्तोम माजले आहे. त्यामुळे मोबाईलमधील अशा अश्लील गोष्टी मोबाईलमधून डिलीट करणे योग्य असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
Join Our WhatsApp Community