मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट अचानक हॅक झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली असून या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील त्यांनी मुंबईकरांना केले आहे. याबाबत अधिक माहिती दिली जात नाही तोपर्यंत रेल्वे पोलिसांच्या ट्विटवरील माहितीवर विश्वास ठेवू नका. या प्रकरणी तपास यंत्रणा सज्ज झाल्या असून, हे हॅक झालेले ट्विटर हँडल लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
(हेही वाचा – ट्वीटरचा ताबा मिळताच, एलाॅन मस्क यांनी सीईओंना दाखवला बाहेरचा रस्ता)
दोन दिवसांपूर्वी लोकप्रिय मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅप सुमारे दीड तास बंद असताना सायबर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. सायबर तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, व्हॉट्सअॅपच्या मेंटेन्सससाठी नाही तर हे सायबर सुरक्षा भंगाचे प्रकरण असण्याची शक्यता आहे. इतक्या वेळ व्हॉट्सअॅप बंद राहिल्याने सर्वच युजर्स हैराण झाले होते. मात्र, व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात हा टेक्निकल एरर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा टेक्निकल एरर का आणि कसा झाला याची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.
सायबर क्राईमच्या घटनेत वाढ
गेल्या काही काळापासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हॅकर्स ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटला टार्गेट करत आहेत. हे थांबवण्यासाठी भारतात सर्व तपास यंत्रणा कार्यरत असून या विरोधात कडक यंत्रणा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community