आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे भाज्यांचे दरदेखील कडाडले आहेत. भाज्यांची आवाक 25 ते 30 टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार आहे.
( हेही वाचा: तीन दिवसानंतर मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास, फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्याने हवेचा दर्जा सुधारला )
दादरच्या भाजी मंडळईतील आजचे भाज्यांचे दर
- फुलकोबी- 100 रुपये प्रति किलो
- फ्लावर- 60 रुपये प्रति किलो
- पालक- 60 रुपये प्रति किलो
- शेपू-50 रुपये प्रति किलो
- बीट-60 रुपये प्रति किलो
- कोथिंबीर- 40 रुपये गड्डी
- कांदा पात- 20 रुपये गड्डी