एलॉन मस्कनी ताबा घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सुरू होणार? ट्विटरने केला खुलासा

182

ट्विटर कंपनी टेकओव्हर करताच एलॉन मस्क अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्विटरवर मालकी हक्क मिळताच त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह वरच्या स्तरावर अलेल्या अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने एक विधान समोर आले असून त्यात एलॉन मस्क यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यासोबतच एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर त्यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर केले जाईल, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. यावर ट्विटरने खुलासा करत हे विधान फेक असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – व्लादिमीर पुतीन पडले भारताच्या प्रेमात; पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक, म्हणाले…)

एलॉन मस्क यांनी त्यांच्या डीलनुसार ट्विटरचा ताबा घेतला आहे. करार रद्द केल्यानंतर काही आठवड्यांनंतर, मस्कने पुन्हा एकदा ट्विटरमध्ये स्वारस्य दाखवले आणि आता ते त्याचे मालक बनले आहेत. टेकओव्हर होताच ट्विटरच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी हकालपट्टी केली. अशा परिस्थितीत एलॉन मस्क ट्विटरच्या धोरणातही अनेक बदल करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काय होते व्हायरल विधान?

धोरणांतर्गत ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना अनेकदा इशारा दिला, पण त्यांनी ऐकले नाही. यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्यात आले. आता एलॉन मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर ट्रम्प यांच्या नावाने एक विधान समोर आले आहे. ट्रम्प यांच्या नावाने करण्यात आलेल्या विधानात एलॉन मस्क यांना ट्विटरवर मालकी मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. असेही लिहिले होते – “मला ट्विटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे की माझे खाते पुन्हा रिस्टोअर केले जात आहे. सोमवारपर्यंत ते पुन्हा अॅक्टिव्ह होईल. बघूया काय होते ते.”

ट्विटरने केला खुलासा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या व्हायरल विधानावर ट्विटर व्यवस्थापनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये ट्विटरने स्पष्ट केले की, प्रसारित करण्यात आलेले विधान फेक आहे. ट्विटरने म्हटले आहे- एलॉन मस्क यांना ट्विटरची मालकी मिळाल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. प्रसारित केलेले हे विधान खोटे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.