वैद्यकीय अभ्यासक्रम हिंदी भाषेतून सुरू करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकराने अलिकडेच घेतला असातना आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. MBBS, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम आता मराठीतून उपलब्ध होतील. मराठीतून शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे यासाठी कोणतेही बंधन नसेल.
( हेही वाचा : सिलिंडरचे दर वाढले; आता गॅसशिवाय बनवा जेवण, सरकारने बाजारात आणला ‘हा’ खास स्टोव्ह)
मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण
मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाची इंग्रजी पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. समिती याची पाहणी करणार आहे.
राज्यात सध्या एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ महाविद्यालये आहेत. यामध्ये जवळपास १० हजार ४५व विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठ १२ तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ३ महाविद्यालयांचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांना भाषा निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य
पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या नव्या शैक्षणित धोरणाचा भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण स्थानिक भाषेतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील तयारी काही महिन्यांमध्येच पूर्ण होणार आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत म्हणून ३ समित्या सुद्धा स्थापन करण्यात आल्या आहेत. MBBS सह सर्व अभ्यासक्रम मराठीतून करण्यात येणार आहेत. परंतु तूर्तास एमबीबीएसला प्राधान्य देण्यात आले आहे. शिक्षण इंग्रजीतून घ्यावे की, मराठीतून याबाबत विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community