Indian Currency: भारतीय नोटेवर कोणाचं चित्र किंवा फोटो छापले जाणार, हे कोण ठरवतं?

166

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे गांधीसोबत भारतीय नोटेवर गणपती आणि लक्ष्मी यांचे फोटो छापण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देवाचा आशीर्वाद मिळेल. असे त्यांचे म्हणणे आहे. हाच मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी जगातील सर्वात मोठा मुस्लिम बहुसंख्य देश असलेल्या इंडोनेशियाचे उदाहरण दिले. मात्र तुम्हाला माहितीये का चलनावर काय छापले जावे, कोणाचे फोटो किंवा कोणते चिन्ह असावे हे कोण ठरवते आणि ते कसे ठरवले जाते?

(हेही वाचा – Indian Currency: नोटांवर का असतात या; तिरक्या रेषा? तुम्हाला माहितीये का? वाचा)

कोणाला असतो नोटा जारी करण्याचा अधिकार?

भारतात चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार हा केवळ भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयला आहे. तर फक्त एक रूपयाची नोट भारत सरकार जारी करते. भारतीय नोटांची रचना, फॉर्म आणि त्याचे साहित्य आरबीआय कायद्याच्या कलम २५ अंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाने प्रस्तावित केले आहे. इतकेच नाही तर भारत सरकार त्याला मान्यता देते.

चलनात बदल करायचा असेल तर…

यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या कलम २२ अंतर्गत नोट जारी करण्याचा अधिकार आरबीआयला आहे. त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो कलम २५ अन्वये रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळ तो बदल प्रस्तावित करते. यानंतर भारत सरकार त्याला मान्यता देते. चलनासंबंधीत सर्व निर्णय आणि संपूर्ण जबाबदारी ही आरबीआयच्या स्वंतत्र विभागाकडे असते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.