१ नोव्हेंबरपासून कारमध्ये सहप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक; नवा नियम टॅक्सी संघटनांना अमान्य

143

चारचाकी वाहनांमध्ये येत्या १ नोव्हेंबरपासून वाहतूक पोलिसांनी सीटबेल्ट सक्ती केली आहे. या निर्णयाला मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने विरोध केला आहे. संघटनेने तसे पत्र मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांना पाठविले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : देशात लवकरच धावणार 15 हजार 500 इलेक्ट्रिक बसेस, तर यूपी-बिहारचे रस्ते अमेरिकेप्रमाणे करणार गडकरींची माहिती )

काळ्या-पिवळ्या टॅक्सीसह सगळ्या चारचाकी गाड्यांमध्ये मागे बसलेल्या सहप्रवाशांनाही सीटबेल्ट बंधनकारक केला आहे. मात्र, केंद्रीय धोरणाने खासगी टॅक्सीशी तुलना करू नये असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबई सहपोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मुंबई शहरात टॅक्सी अपघाताचे प्रमाण शून्य आहे. शहरात वाहनाचा सरासरी वेग हा १२ किलोमीटरपेक्षाही कमी आहे. हे मुद्दे विचारात घेता मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करू नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

सीटबेल्ट बंधनकारक 

मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये वाहन चालकांना आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत यासाठी वाहतूक विभागाने १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.