Mumbai AC Local : १ कोटी मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती! ७ महिन्यांमध्ये प्रतिसाद वाढला

173

मे २०२२ मध्ये सरकारने एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रवाशांनी मोठ्या संख्येने एसी लोकलने प्रवास करण्यास सुरूवात केली. मुंबईतील दोन्ही मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून एप्रिल २०२२ ते आतापर्यंत १ कोटी प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास केला आहे. २०१९-२० च्या तुलनेत या वर्षामध्ये प्रवासी संख्येत ८५ टक्के वाढ झाली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

( हेही वाचा : देशात लवकरच धावणार 15 हजार 500 इलेक्ट्रिक बसेस, तर यूपी-बिहारचे रस्ते अमेरिकेप्रमाणे करणार गडकरींची माहिती)

एसी लोकलला पसंती 

सुरूवातील या एसी लोकलला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वे तिकिटांच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेला. १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरूवात झाली. यामुळे आता लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ७९ झाली आहे.

मध्य रेल्वेची प्रवासी संख्या ७२ लाखांवर 

सप्टेंबरमध्ये दैनंदिन तिकीट विक्री १५ हजार ७८९ होती आता हीच तिकिटविक्री १९ हजारांवर गेली आहे. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वे मार्गावरही एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ७२ लाख ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.