दादरची गर्दी होणार कमी! स्टेशन परिसर ‘या’ वेळेत होणार स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त!

172

दादर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते दादरचं गर्दीने भरलेले फुल मार्केट. आठवड्याच्या कोणत्याही दिवशी दादरच्या मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे दादर स्टेशनवरून रेल्वेने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या गर्दीतून वाट काढणं मोठं मुश्कील होते. मात्र आता दादर स्टेशनबाहेरील गर्दीपासून लवकरच सुटका होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत दादर स्टेशन बाहेरील विक्रेत्यांना फुल विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – ‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, सरकारचा नवविवाहीत महिलांना थेट फोन!)

शुक्रवारी सकाळी दादर फुल मार्केटमध्ये फुल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. दादर स्टेशन परिसराजवळील रस्त्यावर बसणाऱ्या फुल विक्रेत्यामुळे रेल्वे प्रवाशांसह नागरिकांना अडचण होते, त्यामुळे त्या विक्रेत्यांना तेथून उठवून देण्यात आले. मात्र केलेल्या या कारवाईनंतर ते फुल विक्रेते पुन्हा फुल विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दादारच्या पश्चिमेस असणाऱ्या फुल मार्केटमध्ये रात्री १२ वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत विक्रेत्यांना फुलविक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र हा कालावधी त्यांना पुरेसा नसल्याचे फुल विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.

दादरच्या फुल मार्केट परिसरात मुंबई, नाशिक आणि इतर ग्रामीण भागातून फुल विक्री कऱण्यासाठी येतात. त्यांना त्यांचा व्यावसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र मुंबईकर या भागातून जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याला प्रचंड कचरा, घाणीतून वाट काढत जावे लागते. त्यामुळे या समस्येतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मुंबई महापालिका जी उत्तर विभागाच्या वतीने अतिक्रमण विभाग आणि घन कचरा विभागाकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे दादर रेल्वे स्टेशनबाहेरील परिसर स्वच्छ व्हावा, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.