सुमारे दोन महिन्यांपूर्वी घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांब येथून श्रीरामांच्या मूर्तींची चोरी झाली होती. समर्थ रामदास स्वामींनी ज्या मूर्तींची पूजा केली अशा या सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या मूर्ती होत्या. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत आहे, असे सांगितले जाते. ११ मूर्तींची चोरी करण्यात आली होती. या चोरी प्रकरणी हिंदू धर्मियांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सर्व सूत्रे हलवून आरोपीला अटक केली. त्यामध्ये आरोपी धर्मांध मुस्लिम असल्याचे उघड झाले आहे. यातील मुख्य आरोपी हा शेख जिलानी हा असून तो अजून फरार आहे, तर पोलिसांनी शेख हुसेन याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ४ मूर्ती ताब्यात घेतल्या आहेत.
आरोपींवर २ लाखांचे बक्षीस लावले होते
या चोरीच्या घटनेनंतर हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. ठिकठिकाणी निवेदने, मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती. असे असतानाही मूर्तींचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांनी शेवटी दोन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. एकंदरीत पोलीस प्रशासनावर जनतेचा वाढता दबाव लक्षात घेता पोलीस यंत्रणेची तपास चक्रे गतीने फिरवली गेली. त्याचाच परिणाम म्हणून पोलिसांनी दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मूर्तीसह ताब्यात घेतले आहे. एक मुख्य आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग ,घनसांगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची उपस्थिती होती.
(हेही वाचा नुसता जंगली नव्हे, तर शहरी नक्षलवादाचाही बिमोड करा! पंतप्रधान मोदींचे आवाहन)
Join Our WhatsApp Community