सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, येत्या रविवारी सुद्धा मुंबईत मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मध्य रेल्वेवर रविवार ३० ऑक्टोबर रोजी देखभालीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ३ तासांपासून ठप्प; कंटेनर उलटल्यामुळे प्रवाशांची गैरसोय )
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
- ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- कुर्ला आणि वाशी दरम्यान हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
विशेष गाड्या
- तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल- वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील.
- ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community