उद्धव ठाकरेंमुळे टाटा एअरबस प्रकल्प गेला, भाजपचा आरोप

131

सध्या महाराष्ट्रातून एका मागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याने शिंदे-फडणवीस सरकार हे विरोधकांचे लक्ष्य बनत आहे, मात्र त्याचवेळी राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पांमागे याआधीचे ठाकरे सरकार कसे कारणीभूत होते, याचा खुलासा राज्य सरकार करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु

वेदांतानंतर राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधारी युती सरकारला कोंडीत पकडले आहे. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र त्यावर आता भाजपानेही प्रत्युत्तर देत टाटांचा एयरबस प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष स्वत:ला घरात कोंडून घेतल्यानेच एयरबस प्रकल्प गुजरातला गेला. मोदींनी २०१५ साली एयरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एयरबसने ठेवला. २०१७ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली. त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एयरबसने २०२० मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला.  एयरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे. तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आले नाहीत? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? असा सवाल भाजपाने उपस्थित केला.

(हेही वाचा कर्नाटकात २०० उर्दू शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरु)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.