लालबागमधील धक्कादायक घटना! पत्नीवर संशय; आधी ११ वर्षाच्या मुलीची हत्या करून शेअर्स ब्रोकरने संपवले आयुष्य

329
लालबाग

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या ४२ वर्षीय शेअर्स ब्रोकरने ११ वर्षीय मुलीची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लालबागच्या गणेश गल्ली येथे घडली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने पत्नीला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपमृत्युची नोंद करून मृत पित्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : Whatsapp Feature : झुकरबर्गने फेसबुकवरून सांगितले व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर! काय आहे ते जाणून घ्या)

लालबागमधील धक्कादायक घटना 

भुपेश पवार (४२) असे पित्याचे नाव असून आर्या (११) मुलीचे नाव आहे. भुपेश पवार हे शेअर्स ब्रोकर असून ते पत्नी भाग्यश्री (३८)सह लालबाग गणेश गल्ली येथील विमावाला महल या इमारतीत राहण्यास होते. आर्या ही शालेय शिक्षण घेत होती, तर पत्नी एका खाजगी कंपनीत डेटा एन्ट्रीची नोकरी करत आहे.

मंगळवारी दुपारी पत्नी भाग्यश्री ही पतीच्या मोबाईलवर सतत फोन करून देखील फोन घेत नसल्यामुळे तिला संशय आला व ती थेट कामावरून ४ वाजता घरी निघून आली. घराचे दार आतून बंद असल्यामुळे तिने दार ठोठावून आतून काही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे याबाबत संबंधित महिलेने पोलिसांना कळवले. काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून आता प्रवेश केला असता भुपेश पवार आणि मुलगी आर्या दोघे एकाच दोरीला गळफास अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी दोघांना खाली उतरवून तात्काळ केईएम रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.

दरम्यान पोलिसांना घटनास्थळी भुपेश याने लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली असून त्यात त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन माझ्यानंतर मुलीचे काय होणार म्हणून हे पाऊल उचलत असून या घटनेला पत्नीला दोषी ठरवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद घेऊन मृत भुपेश पवार यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.