आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक कंपनी निर्मल लाइफस्टाइल लि.चे संचालक धर्मेश जैन आणि राजेश जैन यांना गुरूवारी अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा : IRCTC : आता शेगावात सुरू होणार रेस्टॉरंट ऑन व्हिल्स! मिळणार सुप्रसिद्ध कचोरी)
आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई
मुलुंड येथील प्रकल्पांमध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली २०२१ मध्ये ग्राहकांनी या बांधकाम व्यावसायिकांना पैसे दिले होते. पण त्यांना अद्याप सदनिकेचा ताबा मिळाला नाही. या प्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारारीनुसार २०१७ पर्यंत सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन ग्राहकांना देण्यात आले होते. पण अद्याप कोणतेही बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
विकासकाने मुलुंडमध्ये ऑल्मपिया, ओमेगा, पॅनोरमा आणि निर्मल वन स्पिरीट हे प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी विकासकाने घर खरेदीदारांकडून सदनिकेसाठी पैसे घेतले होते.
त्यानंतर विकासकाने 2017 मध्ये सदनिका ग्राहकांना देण्याचे आश्वासन दिले, परंतू अंतिम मुदतीनंतर घराचा ताबा ग्राहकांना मिळाला नाही. त्यामुळे चारही प्रकल्पांतील ग्राहकांनी एकत्र येऊन ‘निर्मल लाइफस्टाइल होमल बार्यस रिड्रेसल असोसिएशनची’ स्थापना केली.
कोणती कारवाई करण्यात आली ?
धर्मेश आणि राजीव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 406,420,409,120 ब आणि महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅटस् ( मोफा ) कायद्याच्या कलम 3,4,8 आणि 13 अंतर्गत अटक करण्यात आली. तसेच न्यायालयाने त्यांना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Join Our WhatsApp Community