२५ समोसासाठी केईएमच्या डॉक्टरने मोजले १ लाख ४० हजार

194
२५ समोसासाठी केईएमच्या डॉक्टरने मोजले १ लाख ४० हजार
२५ समोसासाठी केईएमच्या डॉक्टरने मोजले १ लाख ४० हजार

परळ येथील केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरला ऑनलाईन समोसे मागवणे चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरानी २५ समोसासाठी १ लाख ४० हजार रुपयाची किंमत मोजूनही समोसाची साधी चव देखील त्यांना घेता आली नाही. याप्रकरणी डॉक्टरांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

केईएम रुग्णालयात काम करणारे २७ वर्षीय डॉक्टर हे केईएम रुग्णालयातील आरएमओ हॉस्टेल मध्ये राहण्यास आहे. डॉक्टर आणि ओपीडी मध्ये काम करणाऱ्यांनी कर्जत येथे सहलीला जाण्याचा बेत आखला होता. ८ जुलै रोजी डॉक्टर आणि ओपीडीत काम करणारे इतर सहकारी आणि कर्मचारी कर्जत येथे सहलीला जाणार होते. दरम्यान प्रवासात खाण्यासाठी डॉक्टर यांनी सायन येथील प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेलचे समोसे मागविण्यासाठी त्यांनी गुगलवर गुरुकृपा हॉटेलचा संपर्क क्रमांक सर्च केला असता गुगल वर एक वेगळी पेज आले व त्याच्यावर डॉक्टरांनी क्लिक केले असता त्यात ‘गुरुकृपा कॉल मी’ असे लिहून त्यापुढे एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता.

डॉक्टरांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला असता एका व्यक्तीने फोन उचलून हिंदीत बोलू लागला, डॉक्टरांनी त्याला २५ समोसांची ऑर्डर दिली, समोरच्या व्यक्तीने प्रथम तुम्हाला दीड हजार रुपये अँडवान्स द्यावे लागतील असे सांगितले. डॉक्टरांनी अँडवान्स देण्याची तयार दाखवली व फोन ठेवून दिला. डॉक्टरांनी त्याच क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर २५ समोसाची ऑर्डर दिली व १० वाजता ऑर्डर दुकानातून घेण्यास येईल असा मेसेज डॉक्टरांनी केला. काही वेळाने डॉक्टरच्या व्हॉट्सअॅपवर ऑर्डर मिळाली असून दीड हजार पेमेंट पाठवा असे सांगून बँक खाते क्रमांक पाठवला.

(हेही वाचा – Ajit Doval : 33 मुस्लिम देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे मुस्लिम भारतात राहतात; अजित डोवालांचे सौदीच्या नेत्याला प्रत्यूत्तर)

डॉक्टरांनी दीड हजार रुपये ऑनलाईन पाठवल्यानंतर पुन्हा त्यांना कॉल आला आणि ट्रॅन्जेक्शन आयडी तयार करण्यासाठी त्याने सांगितल्यानुसार डॉक्टर वेगवेगळ्या लिंकवर क्लिक करत गेले व डॉक्टरांच्या बँक खात्यातून थोडेथोडे करून १ लाख ४० हजार रुपयाची रक्कम दुसऱ्या खात्यावर वळती झाल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा फोन करून याबाबत विचारले असता शेवटचे ट्रॅन्जेक्शन करा तुमचे सर्व पैसे परत तुमच्या खात्यावर येतील असे सांगण्यात आले व फोन कट झाला. ऑनलाईन फसवणूक झाल्याचे डॉक्टरानाच्या लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.