मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी; Shiv Sena UBT माजी नगरसेवकासह चौघांना अटक

168
मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी; Shiv Sena UBT माजी नगरसेवकासह चौघांना अटक
  • प्रतिनिधी 

मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन दहा कोटींची खंडणी मागणाऱ्या नालासोपाऱ्यातील माजी नगरसेवक आणि आरटीआय कार्यकर्ता असलेल्या स्वप्नील बांदेकरसह चौघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी या चौघांना वसईच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्निल बांदेकर, हिमांशू शहा, किशोर काजरेकर आणि निखिल बोलार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वप्नील बांदेकर हे वसईतील शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) माजी नगरसेवक असून हिमांशू शहा हे तक्रारदार बांधकाम व्यवसायिक यांचे वसईतील एका बांधकाम प्रकल्पात भागीदार आहे.

मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांचे वरळीतील आदर्श नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. गुप्ता यांना एसआरए वांद्रे यांच्याकडून या कामासाठी रीतसर परवानगी मिळालेली आहे. बांधकाम व्यवसायिक आकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाविरोधात स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या. तसेच प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी देण्यात आली होती. त्यासाठी बांदेकर यांनी १० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड होऊन दीड कोटी रुपये ठरले. त्या खंडणीच्या रकमेतील २५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्या वतीने हिमांशू शहा (४५) आला होता. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – आंध्र प्रदेशातील Pakistan वसाहतीचे अखेर झाले नामांतर; जाणून घ्या काय आहे नवे नाव?)

शनिवारी रात्री भाईंदर येथील बनाना लिफ हॉटेलमध्ये नवघर पोलिसांनी सापळा रचून शहा याला अटक केली. त्यानंतर वसई येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली. अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांनी दिली. सर्व आरोपींना रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अटक आरोपींना ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेत २०१५ ते २०२० या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते. शिवसेनेच्या बंडानंतर ते शिवसेना उबाठातच (Shiv Sena UBT) राहिले.

तक्रारदार आकाश गुप्ता यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते २०१२ पासून ते वरळी तसेच वसई विरार परिसरात बांधकाम व्यवसाय करत आहेत. गुप्ता यांच्या कंपनीत हिमांशू शहा हे वसई येथील प्रकल्पात भागीदार आहे. गुप्ता यांच्या कंपनीला वरळी आदर्श नगर येथील दर्शन सोसायटीच्या पुर्नविकासाचे काम मिळाले होते. या प्रकल्पात २४० झोपडपट्टीधारक आहेत. झोपडपट्टीधारकांना २ वर्षांचे भाडे देण्यात आले आहे. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी परवागनी मिळाली असून काम सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी या तक्रारी दिल्या होत्या. त्यावेळी तक्रारदाराच्या कंपनीतील भागीदार हिमांशू शहा याने स्वप्नील बांदेकर याला तक्रारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – हवाई प्रवाशांना मिळणार दिलासा; Pune Airport वरील ‘डिजियात्रा’ लवकरच होणार सुरू)

२२ ऑक्टोबर २०२४ रोजी माटुंगा येथील स्टार बक्स कॉफी शॉपमध्ये बांदेकर, हिमांशू शहा, किशोर आणि निखिल यांची तक्रारदार आकाश गुप्ता यांची पहिली बैठक झाली. या बैठकी दरम्यान तक्रारी मागे घेण्यासाठी १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अखेर दिड कोटीत तडजोड झाली. तक्रारदार २५ लाख देण्यास तयार झाले. त्यातील नोव्हेंबर २०२४ आणि डिसेंबर २०२४ मध्ये दर महिल्याला २५ लाख तर जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रति महिना १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र गुप्ता पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना धमकावण्यात येत होते. अखेर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवघर पोलिसांनी स्वप्नील बांदेकर, हिमांशू शहा, किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८ (३) ३०८ (४), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.