पुण्यात आरटीओ कार्यालयाच्या आवारात १० वाहनांना आग

रविवार, १५ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता पुण्यातीव विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओमधील आवारामध्ये जप्त केलेल्या वाहनांनी पेट घेतला. त्यानंतर लागलीच या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली, त्यामुळे आग विझवण्यासाठी तत्काळ अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली.

१० वाहने पेटली

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी चारचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहताच तीन बाजूने पाण्याचा मारा सुरू करुन आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही. या आगीमध्ये ४ कार, ४ लक्झरी बस, १ टेम्पो व १ डंपर अशी एकूण १० वाहने पेटली होती. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाकडून येरवडा, नायडू, धानोरी अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहने व अग्निशमन मुख्यालयातून २ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.

(हेही वाचा इथोपियाचा हायले लेमी ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here