मुंबईसह राज्यातील १०४ पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी (Assistance Police Commissioner) बढती देण्यात आली आहे. बढती देण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाच्या यादीत मुंबईतील २२ (नि:शस्त्र) पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आलेल्या मुंबईतील अधिकारी यांना मुंबईतच पदोन्नती देण्यात आली आहे. (Maharashtra Police ACP Promotion)
मुंबईसह राज्यभरातील १०४ (नि:शस्त्र) पोलीस निरीक्षक यांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी (ACP) पदोन्नती देण्यात आली आहे. गृह विभागाकडून शुक्रवारी काढण्यात आलेल्या या आदेशात पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे पुणे आणि नवी मुंबईसह राज्यातील १०४ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांची बदली करण्यात आली आहे. (Maharashtra Police ACP Promotion)
(हेही वाचा – Marol Military Road : मिलिटरी रोडसह मरोळ भागांतील तुंबणाऱ्या पाण्यावर सापडला उतारा)
मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार, विशेष शाखेचे चंद्रशेखर भाबळ, शबाना शेख, सुनयाना नाटे, ज्योती देसाई, दीपक शिंदे, दत्तात्रय पाबळे, विश्राम अभ्यंकर, कल्याण कर्पे, मुरलीधर कर्पे, कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय हातीसकर, सचिन सांडभोर मुंबईतून इत्यादी अधिकारी यांचा समावेश आहे. (Maharashtra Police ACP Promotion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community