भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी बांगलादेशींना (Bangladeshi) दिल्या जाणाऱ्या बनावट कागदपत्रांवरुन धक्कादायक माहिती समोर आणली आहे. महाराष्ट्रातील काही भागात बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना (Rohingya) बनावट जन्म दाखले दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अनेक आरोप केले आहेत. (Kirit Somaiya)
Bangladeshi Rohingyas Birth Certificate Scam
Want FORENSIC Audit of all 2,14,307 Applications
I wrote & talked to CM @Dev_Fadnavis that 97% “Delayed Birth Registration Applications” belongs to Bangladeshi Rohingyas Muslims. Most of the Documents are FORGED & FALSE Declarations pic.twitter.com/GWPO5IyhUO
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 28, 2025
मागील काही महिन्यांमध्ये राज्यभरात २ लाख १४ हजार बांगलादेशी, रोहिंग्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचे अर्ज देऊन बोगस कागदपत्र देऊन प्रमाणपत्रे मिळविली, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यात केला आहे. महाराष्ट्रातील टॉप दहा ठिकाणांमध्ये जालन्यातील भोकरदन तालुका असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणासंदर्भात सोमय्या यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली. (Kirit Somaiya)
बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा
उद्या मी जालना परभणी लातूर जील्हाचा दौरा करणार, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
सन 2024 मधे जन्म प्रमाणपत्र दिले
लातूर 3421
परभणी 3202
भोकरदन 2594
जालना 2179Tomorrow I will visit Jalna Parbhani Latur for Bangladeshi Birth Certificate Scam pic.twitter.com/fy4KWkiyt0
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 27, 2025
बांगलादेशी रोहिंग्यांचे प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्रात २ लाख१४ हजार अर्ज आले. १ लाख २३ जणांना प्रमाणपत्र दिले. लातूर जिल्ह्यात ९९७१ अर्ज आले. यातील ९९ टक्के अर्ज बांगलादेशी मुस्लिमांचे आहेत. हे प्रमाणपत्र मिळवून देण्यामागे काही अतिरेकी संघटनेचे नेते आहेत. पश्चिम बंगाल, बांगलादेश सीमेवर कामकरणारे दोन पॉलिटिकल एजंट आहेत, म्हणून याचा तपास एटीएसला दिला गेला पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. (Kirit Somaiya)
बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा
मी 11.30 वाजता कल्याण तहसीलदार कार्यालयाची भेट घेणार.
Bangladeshi birth certificate scam
I will visit Kalyan Tehsildar office at 11.30am@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 29, 2025
परभणीसारख्या तालुक्यातून ३ हजार २०२ बांगलादेशीय रोहिंग्यांना प्रशासनाद्वारे जन्म प्रमाणपत्र वितरित झाले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत किरीट सोमय्या यांनी परभणीत एका बैठकीतून व्यक्त केले आहे. (Kirit Somaiya)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community