बांगलादेशी विरुद्ध विशेष पथकाने १२ Bangladeshi Citizens घेतले ताब्यात; ८ जणांना अटक

54
बांगलादेशी विरुद्ध विशेष पथकाने १२ Bangladeshi Citizens घेतले ताब्यात; ८ जणांना अटक
  • प्रतिनिधी 

मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ७ च्या विशेष पथकाने वर्सोवा आणि जुहू गल्ली येथून १२ बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizens) ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये ४ महिला ४ पुरुष आणि ४ बालकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून हे सर्व जण घुसखोरी करून बेकायदेशीररित्या भारतात राहत होते अशी माहिती समोर आल्यानंतर विशेष पथकाने ताब्यात घेतलेल्या १२ बांगलादेशी नागरिकांपैकी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. बुधवारी त्यांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्यात घुसखोर बांगलादेशी नागरिकांचे (Bangladeshi Citizens) प्रमाण वाढल्यामुळे या घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने घुसखोर करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभरात पोलिसांनी घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. विशेष करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. मुंबईतील पूर्व उपनगरातील परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या नेतृत्वाखाली घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त विजयकांत सागर हे करीत असून पोलीस निरीक्षक रवी ठेंगळे हे या पथकाचे प्रमुख आहे.

(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभात 5 कोटींहून अधिक भाविकांनी केले अमृतस्नान)

या पथकात परिमंडळ ७ चे ३ अधिकारी आणि ७ कर्मचारी आहेत. या पथकाचे प्रमुख रवी ठेंगळे यांना खबऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा आणि जुहू गल्ली येथून ४ लहान मुलांसह १२ बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizens) ताब्यात घेण्यात आले. त्यात ४ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून पोलिसांनी वोटर कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शिधावाटप पत्रिका सापडली आहे. ही सर्व ओळखपत्रे बोगस कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी विशेष पथकाने ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलीस यांनी १२ बांगलादेशी यांची केली अटक आहे, अटक करण्यात आलेल्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत. रोहिमा शहाबुद्दीन खान (४९), शकील कादर शेख (३०), रूखसाना शकील शेख (३५), वहीदुल फैजल खान (४१), जस्मिन वहीदुल खान (३८), सिमरन वहीदुल खान (२०), हसन अब्दुल रशीद खान (६५) आणि अब्दुल आजीज (५५) अशी अटक करण्यात आलेल्या ९ जणांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले बांगलादेशी नागरिक हे घुसखोरी करून मुंबईतील जुहू गल्ली आणि वर्सोवा येथे मागील २५ ते ३० वर्षापासून राहत होते. यातील महिला स्पा आणि फॅमिली सलुन काम करीत होत्या अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांगलादेशी घुसखोरांनी निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे वोटर ओळखपत्रावरून समोर आले आहे. तसेच या घुसखोरांनी भारतीय सरकारी योजनांचा लाभ घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच या बांगलादेशी पैकी सहा जणांकडे बांगलादेशी व्हिसा मिळून आले असून हे घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi Citizens) भारतीय असल्याची कागदपत्रे सादर करून बांगलादेशात जाण्यासाठी व्हिसा मिळवला होता. त्या व्हिसावर त्यांनी बांगलादेशाच्या अनेक वाऱ्या केल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आठ जणांना बुधवारी विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले असता ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बांगलादेशींविरुद्ध विशेष पथकाने मागील दोन आठवड्यात मुंबईतून ३० बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.