धक्कादायक! वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतल्यावर १५ वर्षीय मुलीने केली आत्महत्या

127

सोशल मीडियावर जास्त वेळ वाया घालवून शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वडिलांनी १५ वर्षीय मुलीकडून तिचा मोबाईल फोन काढून घेतला. या रागात १५ वर्षाच्या मुलीने सात मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालाड मालवणी येथे घडली आहे.

( हेही वाचा : मराठी नाटकांना अल्पदरात नाट्यगृह उपलब्ध करुन देणार – मुनगंटीवार )

मालाड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीत शिकणारी १५ वर्षाची मुलगी आई वडील आणि लहान बहिणीसह मालाड मालवणी परिसरात राहत होती. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे तिला मानसिक विकार जडला होता, तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही ती घरातून पळून गेली होती. पोलिसांनी तिला शोधून काढले होते आणि त्यावेळी तिला तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यापूर्वी तिचे समुपदेशन करण्यात आले होते.

शनिवारी कुटुंबियांनी तिचा मोबाईल फोन काढून घेतल्यावर ती रागाने घरातून निघून गेली होती, त्यानंतर मालाड लिबर्टी गार्डनजवळील एका ७ मजली इमारती जवळ शनिवारी सायंकाळी तिचा मृतदेह आढळला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने जवळच असणाऱ्या सात मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.