Mumbai Airport : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) कस्टम विभागाच्या पथकाने 1.02 कोटी रु. किंमतीच्या २४ कॅरेट (24 carat gold) सोन्याच्या सळ्या (16 तुकडे) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात कस्टम विभागाने एका संशयिताला अटक करून त्याच्या विरोधात सीमाशुल्क कायद्या (Customs Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Airport)
(हेही वाचा – MSRDC ला समृद्धी महामार्गसाठी प्रतिष्ठित Scotch Awards 2025 जाहीर)
सीमा शुल्क विभागाच्या कर्तव्यावर असलेल्या पथकाला 4 एप्रिल 2025 रोजी जेद्दाहहून इंडिगो एअरलाइन्समधून (Indigo Airlines) आलेल्या एका प्रवाशाच्या सामानाचा संशय आला. त्या सामानाची सखोल तपासणी करताना सामान तपासणी यंत्रामध्ये दोन इलेक्ट्रिक इस्त्रीमध्ये गडद प्रतिमा आढळल्या. इस्त्री उघडून पाहिल्यावर त्यामधून 24 कॅरेट सोन्याच्या सळ्या (16 तुकडे) सापडले. या सगळ्यांचे एकूण वजन 1200 ग्रॅम आहे. बाजारात या 24 कॅरेट सोन्याच्या 16 तुकड्यांची अंदाजित किंमत 1.02 कोटी रुपये आहे. या प्रकरणात संशयीत प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community