Thane News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

384
Thane News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

कळव्यातील महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय कोमल राठोड हिचा उपचारातील हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. कोमलच्या छातीतील गाठ काढण्यासाठी १ ऑक्टोबरला कळव्यातील आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर श्याम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबरला तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. ती यशस्वी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Thane News)

मात्र, शस्त्रक्रियेनंतर लगेचच कोमलला १०५ डिग्री ताप आणि अंग सुजल्याची लक्षणे दिसू लागली. इन्स्पेक्शन यंत्रणा नसल्यानं तिच्या पुढील उपचारासाठी तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथे तिची प्रकृती आणखी गंभीर झाली, आणि ७ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. (Thane News)

(हेही वाचा – Haryana Assembly Election : हरियाणात ५७ वर्षात पहिल्यांदाच असे घडले; भाजपची विजयी हॅट्रिक)

कोमलच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, डॉक्टर पांडे यांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी कळवा पोलीस ठाण्याबाहेर जमाव केला आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर यांनी कुटुंबीयांना शांत राहण्याचे आवाहन करत मृतदेह ताब्यात घेण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर, शवविच्छेदन अहवालात चुकीच्या उपचाराचा पुरावा मिळाल्यास डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Thane News)

ही घटना संपूर्ण कळवा परिसरात संतापाची लाट पसरवणारी ठरली आहे. मृत कोमल नववीत शिकत होती आणि अभ्यासात प्रगतीशील असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. तिच्या अचानक मृत्यूमुळे महात्मा फुले नगर परिसरात शोककळा पसरली आहे. (Thane News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.