नायजेरियन नागरिकांच्या पोटातून काढल्या कोकेनच्या १६७ कॅप्सूल

अदिस अबादा मार्गे मुंबईला प्रवास करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांकडून अंमली पदार्थाची भारतात तस्करी केली जाऊ शकते या गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय आणि एमझेडयु यांच्या पथकाने मुंबई विमानतळावर पाळत ठेवली होती. ३ मार्च रोजी डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या दोघांना अटक केली, तेव्हा त्यांच्या पोटातून कोकेनच्या १६७ कॅप्सूल सापडल्या.

वैद्यकीय तपासणीत दोन प्रवाशांनी काही पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याचे आढळून आले होते. या प्रवाशांनी 3 दिवसांच्या कालावधीत एकूण 167 कॅप्सूल गिळल्या होत्या, त्या कॅप्सूलमध्ये गुंडाळलेल्या पदार्थाची चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यात कोकेन आढळून आले. त्या कॅप्सूलमधून एकूण 2.976 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे आणि NDPS कायदा, 1985 नुसार जप्त करण्यात आले आहे. अवैध आंतरराष्ट्रीय बाजार याचे मूल्य सुमारे 29.76 कोटी रुपये होते. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

(हेही वाचा राहुल गांधींचे चीन प्रेम; नेटकरी घेतायेत खरपूस समाचार )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here