Bangladeshi Infiltrators : तृतीयपंथीयांसह १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक; गोवंडी, आरसीएफ पोलिसांची कारवाई

93
Bangladeshi Infiltrators तृतीयपंथीयांसह १७ जणांना अटक; गोवंडी, आरसीएफ पोलिसांची कारवाई
  • प्रतिनिधी 

मुंबई पोलिसांकडून मुंबईसह उपनगरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई अतितीव्र करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील गोवंडी शिवाजी नगर आणि आरसीएफ पोलिसांनी मागील २४ तासांत केलेल्या कारवाईमध्ये १७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशीयांमध्ये ८ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. हे तृतीयपंथी बांगलादेशी नागरिक मागील ५ ते ६ वर्षांपासून शिवाजी नगर गोवंडी येथे राहत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – Coastal Road वरील मिनी चौपाटीवर पोलिस चौकी आणि सार्वजनिक शौचालय उभारणार)

बैसाखी एमडी शहाबुद्दीन खान (२४), मुळगाव : मोहजर कॉलनी नंदीपाडा, बाशाबो झोन सहा ढाका, देश – बांगलादेश, मो. रिदोय मिया पाखी (२५) मुळगाव : बाश हटी ठाणा ईश्वर गंज जिल्हा किशोर गंज, देश – बांगलादेश, मारूफ इकबाल ढाली (१८) मुळगाव : रूपगंज नारायण गंज ढांका देश – बांगलादेश, शांताकांत ओहीत खान (२०) मुळगाव : इब्राहिमपूर कमरुल ढांका देश – बांगलादेश, बर्षा कोबीर खान (२२) मुळगाव : शिवगंज डाकघर मुरपारा, ठाणा रूपगंज जिल्हा- नारायणगंज देश – बांगलादेश, मो. अफजल मोजनूर हुसेन (२२) मुळगाव : गोपीनाथपूर गुजा दिया, ठाणा करीमगंज जिल्हा किशोरगंज देश – बांगलादेश, मिझानुर इब्राहिम कोलील (२१) मुळगाव : बटवार गोप सुंदर ठाणा करीमगंज जिल्हा – किशोरगंज देश – बांगलादेश, शहादत आमिर खान (२०) मुळगाव, भुलता गावसिया ठाणा रूपगंज जिल्हा – नारायण गंज देश, बांगलादेश असे शिवाजी नगर पोलिसांनी रफिक नगर येथून अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशी तृतीयपंथीयांची नावे आहेत. हे आठही तृतीयपंथी रफिक नगर येथील भारतीय तृतीयपंथीयांसोबत मागील काही वर्षांपासून राहत होते. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – आमचे सरकार प्रगतीचे, महाराष्ट्र थांबणार नाही; DCM Eknath Shinde यांचे विधान)

दरम्यान आरसीएफ पोलिसांनी मामुन मातुरेहमान जम्मातदार (२७), मुळगाव दुरुइल, ठाणा नोबीनाघर, जिल्हा ब्राम्हणबरिया, देश बांगलादेश, आसिबुल अकबर मुल्ला (३०), मुळगाव : गाजिरहाट सिलिमपूर, थाना कालिया, जिल्हा नोराईल, देश बांगलादेश, मेहंदी रफिक खान (३८), मुळगाव : चारभंगा, पोस्ट, बायरा बाजार, ठाणा सिगाइर जिल्हा माणिकगंज, देश बांगलादेश, नूर मतलब शेख (३९), मुळगाव बोईसार, जिल्हा ढाका, देश बांगलादेश, रुबीना उर्फ रेश्मा असीबुल मुल्ला (३२), मुळगाव : परमेश्वर पूर गाव पोस्ट मोहम्मदपुर, थाना मोहम्मदपुर, जिल्हा माघुरा, देश बांगलादेश, सुर्वी अख्तर कुकोण मियां (१९), मुळगाव पिघणा, शोरीशबाडी जिल्हा जिमलपूर देश बांगलादेश, तानिया अख्तर मीम उर्फ माही खान (२०), मुळगाव पिघणा, शोरीशबाडी जिल्हा जिमलपूर देश बांगलादेश, शहारीया अख्तर मेघला (२०) मुळगाव शिरोमणी पश्चिम पाडा, थाना शान जहान अली, जिल्हा – खुलना, देश बांगलादेश, सादिया इस्लाम मिम (२५), मुळगाव : नारायणगंज, पोस्ट नारायण गंज, ठाणा सिंधी लगंज, जिल्हा – नारायण गंज, देश बांगलादेश. या नऊ जणांना बिल्डिंग नंबर ४१ जवळ, माहूल म्हाडा वसाहत, माहुलगाव, चेंबूर येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ४ पुरुष ५ महिला आहेत. हे ९ जण २०२३ मध्ये भारतात घुसखोरी करून आले होते. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.