राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू झाल्यानंतर मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत 4 जिल्ह्यांमधून अनेक बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 17 दहशतवाद्यांना अटक (Manipur terrorists arrested) करण्यात आल्याची माहिती इंफाल पोलिसांनी शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी दिली. (Manipur)
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, राज्याच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील (Bishnupur District) मोइरांग कियाम लीकाई भागातून बंदी घातलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुप (केवायकेएल) संघटनेशी संबंधित 13 दहशतवाद्यांना गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 27 जिवंत काडतुसे, 3 वॉकी-टॉकी सेट, कॅमफ्लाज युनिफॉर्म आणि इतर सामरिक वस्तू देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इंफाल-पूर्व जिल्ह्यातील न्गारियन चिंग भागातून प्रतिबंधीत युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या (पी) एका दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
(हेही वाचा –Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ‘अभिजात मराठी’ चा जयघोष; ग्रंथदिंडीने दिल्लीकर मंत्रमुग्ध )
तसेच सुरक्षा दलांनी गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील न्गाईखोंग खुल्लान भागातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (सिटी मेइतेई) च्या एका कार्यकर्त्यांला अटक केली.काकचिंग जिल्ह्यातील काकचिंग सुमक लीकाई भागातून पोलिसांनी खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुपच्या (केवायकेएल) सक्रिय कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी इंफाल-पश्चिम (Imphal) जिल्ह्यातील फिडिंगा येथून केसीपीच्या (पीडब्ल्यूजी) एका कॅडरला देखील अटक केली आहे.
(हेही वाचा –Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या बदनामी प्रकरणी विकीपीडियावर गुन्हा दाखल)
दरम्यान, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह (Biren Singh resigns) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात गुरुवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला, त्यानंतर राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. मणिपूरमधील मेतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारामुळे बिरेन सिंग यांच्यावर सतत टीका होत होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community