Chembur Crime News : चेंबूर येथे १७ वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेहाचे केले ४ तुकडे, एकाला अटक

189
Crime News : ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला, एकाला अटक

पूर्व उपनगरातील चेंबूर येथे १७ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे ४ वेगवेगळे तुकडे करून मृतदेह घरातच लपवून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. पत्नीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Pulses Price Hike : टोमॅटोनंतर आता डाळींमुळे कोलमडणार महिन्याचे बजेट, वाचा वर्षभरात किती झाली भाववाढ…)

ईश्वर भगवान मारवाडी (१७) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. शफीक अहमद अब्दुल मलिक शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वयाच्या ८ व्या वर्षी आई वडिलांचे छत्र हरपल्याने ईश्वर हा चेंबूर वासीनाका म्हाडा वसाहत येथील एका कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. या कुटुंबाने त्याला मानसपुत्र मानले होते. त्याच कुटुंबातील तरुणीचे शफीक अहमद अब्दुल मलिक शेख (३३) या रिक्षाचालका सोबत विवाह झाला होता. शफीक अहमद हा देखील म्हाडा वसाहतीत दुसऱ्या इमारतीत राहण्यास आहे.

२८ ऑगस्ट रोजी शफीक आणि ईश्वर सोबत गेले होते, त्यानंतर ईश्वर हा बेपत्ता झाला होता. शफीकचे सासरे यांनी त्याच्याकडे अनेक वेळा ईश्वर बाबत चौकशी केली; परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर ईश्वरच्या मानलेल्या पित्याने याबाबत पोलिसांकडे संशय व्यक्त केला. बुधवारी सकाळी पोलिसांनी शफीकला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ईश्वर हा आपल्या पत्नीशी जवळीक साधून तिच्या अंगाशी छेडछाड करायचा, हे शफीकला आवडत नव्हते, त्याने ईश्वरला समज दिली होती, परंतु ईश्वरला समज देऊनही तो ऐकत नसल्याचे बघून अखेर त्याला संपविण्याचे ठरवले.

सोमवारी शफीक हा ईश्वरला घेऊन स्वतःच्या घरी आला. त्या ठिकाणी ईश्वरची कोयत्याने हत्या केली, ईश्वरच्या मृतदेहाचे 4 तुकडे करून मृतदेह गोणीत कोंबून स्वयंपाक घरात लपवून ठेवला होता, अशी माहिती समोर आली. आरसीएफ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शफीक याच्या विरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.