GST Return Scam : १७५ कोटींचा जीएसटी घोटाळा; कंपन्यांच्या संचालकपदावर हमाल, वेटर, ड्रायव्हर

जीएसटी रिटर्न करण्यासाठी १६ कथित कंपन्याच्या संचालक मंडळावर वेटर, हातमाग कामगार, वाहन चालक आणि हमालांची नावे आढळून आली आहे. यातील काही कंपन्या केवळ कागदावर असून त्या वास्तव्यातच नसल्याचे तपासात समोर आले आहे.

783
GST Return Scam : १७५ कोटींचा जीएसटी घोटाळा; कंपन्यांच्या संचालकपदावर हमाल, वेटर, ड्रायव्हर

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) दाखल केलेल्या १७५ कोटींच्या जीएसटी रिटर्न घोटाळा प्रकरणात (GST Return Scam) धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीएसटी रिटर्न करण्यासाठी १६ कथित कंपन्याच्या संचालक मंडळावर वेटर, हातमाग कामगार, वाहन चालक आणि हमालांची नावे आढळून आली आहे. यातील काही कंपन्या केवळ कागदावर असून त्या वास्तव्यातच नसल्याचे तपासात समोर आले आहे. या जीएसटी रिटर्न घोटाळा प्रकरणात एका जीएसटी अधिकाऱ्यासह १६ कथित कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (GST Return Scam)

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) जीएसटी अधिकारी अमित लाळगे (Gst Officer Amit Lalge) विरुद्ध कथित कंपन्यांच्या खात्यावर १७५.९३ कोटी रुपयांची जीएसटी रिटर्न रक्कम पाठवून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित लाळगे (Amit Lalge) यांची तत्कालीन नेमणूक वस्तू व सेवाकर विभाग जीएसटी भवन, माझगाव मुंबई येथे करण्यात आली होती. अमित लाळगे (Amit Lalge) यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून त्यांच्याकडे घाटकोपर विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२१ आणि २०२२ या कालावधीत अमित लाळगे यांच्या विभागात येणाऱ्या १६ कथित करदात्या कंपन्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून जीएसटी क्रमांक मिळवला होता. या दरम्यान या १६ कंपन्यांनी शासनाला कुठलाही ‘कर’ (GST) न भरता कर परतावा मिळावा म्हणून करपरताव्याचे ३९ अर्ज सादर केले होते. हा कर परतावा १७५.९३ कोटी मिळावा म्हणून हे अर्ज करण्यात आले होते. (GST Return Scam)

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test Preview : ३ फिरकी गोलंदाज खेळवायचे की, ३ तेज गोलंदाज?)

जीएसटी विभागाच्या विशेष तपास पथकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ANTI-CORRUPTION BUREAU) सादर केलेल्या अहवालात अमित लाळगे (Amit Lalge) यांनी ज्या १६ कथित कंपन्यांच्या खात्यावर जीएसटी रिटर्नची १७५ कोटींची रक्कम पाठवली, त्यातील अनेक कंपन्या केवळ कागदावर असून वास्तव्यास नसल्याचे समोर आले आहे. या कंपन्या कुर्ला आणि घाटकोपर येथे दाखविण्यात आलेल्या असून या कथित कंपन्यांच्या संचालक मंडळावर असलेल्या संचालकाची माहिती मिळवण्यात आली संचालक म्हणून वाहन चालक, मजूर, हमाल, हातमाग कामगार असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेली १७५.९० कोटी ही रक्कम काढण्यात आलेली असून ही रक्कम कोणी काढली यासंदर्भात संबंधित बँकांना नोटीस पाठवून याबाबतची माहिती घेण्यात येणार आहे. (GST Return Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.